Ad will apear here
Next
मायलेकींची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड
चेन्नई : आई आणि मुलगी यांची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड होण्याची अनोखी घटना चेन्नईत घडली आहे. तीन मुलींची आई असलेल्या ४७ वर्षीय एन. शांतिलक्ष्मी यांनी त्यांची २८ वर्षीय मुलगी आर. थेनमोझीसह सरकारी नोकरीसाठीची परीक्षा दिली. दोघीही परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे आई आणि मुलीची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड होण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर कोरला गेला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या मायलेकींचे हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. 

एन. शांतिलक्ष्मी यांनी बीए आणि बीएड या पदव्या घेतल्या होत्या; मात्र तीन मुली आणि पतीसह त्या संसारात रमून गेल्या होत्या आणि गृहिणी म्हणूनच कार्यरत होत्या; मात्र २०१४मध्ये त्यांचे पती ए. रामचंद्रन यांचा मृत्यू झाल्यानंतर घर चालवण्यासाठी नोकरी करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी त्यांची मुलगी आर. थेनमोझी ही थेनी जिल्ह्यात जी. सेंथिलकुमार चालवत असलेल्या मार्गदर्शन वर्गात जाऊ लागली. तिच्या प्रवेशासाठी आलेल्या शांतिलक्ष्मी यांना सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेली परीक्षा त्याही देऊ शकतात, ही माहिती मिळाली. तेव्हा त्यांनीही त्या वर्गात उपस्थित राहायला सुरुवात केली. 

तमिळनाडू राज्य सेवा आयोगातर्फे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उच्चशिक्षित उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शांतिलक्ष्मी या परीक्षेसाठी पात्र ठरल्या. 

‘परीक्षेच्या तयारीसाठी घेण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गात इतर सर्व उमेदवार शांतिलक्ष्मी यांच्या मुलीच्या वयाचे होते. तरीही त्या कधी वर्गात यायला लाजल्या नाहीत किंवा प्रश्न विचारायला बिचकल्या नाहीत. कधी त्या वर्गात हजार राहू शकल्या नाहीत, तर त्यांची मुलगी त्यांना त्या दिवशी घरी शिकवत असे,’ असे सेंथिलकुमार यांनी सांगितले.


शांतिलक्ष्मी यांची आरोग्य खात्यात नियुक्ती झाली असून, तमिळ साहित्यात बी. ए. केलेल्या त्यांच्या मुलीची हिंदू धार्मिक आणि धर्मादाय खात्यात नियुक्ती झाली आहे. 

‘माझी आरोग्य खात्यात नियुक्ती झाली आहे. थेनी जिल्ह्यात माझे पोस्टिंग होईल, अशी आशा आहे. अर्थात, तिथे पोस्टिंग झाले नाही, तरी मी माझ्या नोकरीचे ठिकाण जिथे असेल तिथे रुजू होणार आहे,’ असे शांतिलक्ष्मी यांनी सांगितले. 

आयुष्यातील बराच काळ गृहिणी म्हणून व्यतीत केल्यानंतर मुलीच्या बरोबरीने अभ्यास करून, परीक्षा उत्तीर्ण होऊन जिथे पोस्टिंग होईल तिथे जाण्याची तयारी दाखविणाऱ्या शांतिलक्ष्मी केवळ त्यांच्याच पिढीतील नव्हे, तर तरुण पिढीतील मुलींसाठीही प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे धैर्य, काळाबरोबर बदलण्याची तयारी नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZWKBY
Similar Posts
डी. गुकेश बनला देशातील सर्वांत लहान ग्रँडमास्टर नवी दिल्ली : चेन्नईच्या अवघ्या साडेबारा वर्षांच्या डी. गुकेशच्या रूपाने देशाला सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर मिळाला आहे. १७व्या दिल्ली आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना त्याने १५ जानेवारी २०१९ रोजी हा विक्रम केला. तो भारतातील पहिल्या, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान वयाचा ग्रँडमास्टर ठरला आहे
तमिळनाडूतील मसिलामणी ठरली देशातील पहिली अस्थिमज्जादाती नवी दिल्ली : तमिळनाडूतील एका छोट्या गावातील मसिलामणी या २६ वर्षांच्या महिलेने केलेल्या अस्थिमज्जा (बोन मॅरो) दानाच्या कार्यामुळे नवी दिल्लीतील एका तीन महिन्यांच्या मुलाला नवे जीवन मिळाले आहे. त्याला असलेल्या असाध्य विकारावर केवळ अस्थिमज्जा प्रत्यारोपण एवढाच उपाय होता. मसिलामणीच्या स्वतःच्या मुलीला थॅलेसेमिया हा गंभीर विकार आहे
ऑस्ट्रेलियातील अंतराळ परिषदेत नाशिकची देवयानी नाशिक : २४ ते २६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार असलेल्या १८व्या अंतराळ संशोधनविषयक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मूळची नाशिक येथील असलेली देवयानी गुजर हिची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्पेस रिसर्च कॉन्फरन्स असे या परिषदेचे नाव असून, ती क्वीन्सलँड राज्याच्या गोल्ड कोस्ट या किनारपट्टीवरील शहरात होणार आहे
‘श्रद्धा’पूर्वक मेहनतीतून ‘समर्थ’तेकडे... रत्नागिरी : महिला स्वयंसाह्यता बचत गटांची चळवळ आता राज्यभरात चांगलीच फोफावली आहे; मात्र उत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी दीर्घ काळ करणाऱ्या बचत गटांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. अशा दुर्मीळ बचत गटांमध्ये रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील श्रद्धा सबुरी गटाचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. या गटातील महिलांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language